@ncpSpeaks
ही तर पीडितांची चेष्टा - चित्रा वाघ ...
पुढे वाचामनौधर्य योजनेंतर्गत बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ल्यात पीडित झालेल्यांना ३ लाख रुपयांची मदत राज्य सरकारतर्फे केली जायची. या मदतीची मर्यादा ३ लाखांवरून १० लाख रूपये करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकार पीडितांची चेष्टा करतंय असं म्हणत सरकारवर टीका केली. ...
समृद्धी महामार्ग रद्द होण्यासाठी राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा ...
पुढे वाचामुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी आज शहापूर मध्ये २५० महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा या आंदोलनात सहभागी झाले होते. पावसाळी अधिवेशनात समृद्धी महामार्ग रद्द व्हावा, हा विषय लावून धरू अशी घोषणाही त्यांनी केली. ...२० जुलै रोजी सरकारविरोधात चक्काजाम तसेच जेलभरो आंदोलन करणार - पांडुरंग बरोरा ...
पुढे वाचाआज ठाण्यात टिप-टॉप प्लाझा येथे ठाणे ग्रामीण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा व संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, राष्ट्रवादीच्या उपस्थित नेत्यांनीही यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ...
No comments:
Post a Comment